#CT17: इंग्लंडची विजयी सलामी, बांगलादेशवर 8 गडी राखून विजय

0
इंग्लंड संघाने चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये शानदार विजयी सलामी दिली.
इंग्लंडने 8 गड्यांनी सामना जिंकून दमदार सुरुवात केली.
लियाम प्लंकेटच्या (4/59) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ ज्याे रूट (नाबाद 133), अॅलेक्स हेल्स (95) अाणि कर्णधार इयान माेर्गनच्या (नाबाद 75) तुफानी फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने 47.2 षटकांत सामना जिंकला.
तमीम इक्बालच्या (128) शतकाच्या बळावर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 6 बाद 305 धावा काढल्या हाेत्या.
प्रत्युत्तरामध्ये ज्याे रूट अाणि इयान माेर्गनने केलेल्या 143 धावांच्या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने 2 गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले.

LEAVE A REPLY

*