Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशकात पोलिसांचा मनाई आदेश; पूर परिस्थितीत विरोध केल्यास होतील गुन्हे दाखल

Share

नाशिक | प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितिच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलिसांनी मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पूरपरिस्थितीत प्रशासनास विरोध करणाऱ्या तसेच आदेशाचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

या आदेशानुसार ब्रिजवर, नदी किनारी, धबधब्याच्या ठिकाणी 1. सेल्फी काढणे 2.पुरात पोहणे 3. पुर पाहण्यासाठी गर्दी करणे 4. अश्या ठिकाणी प्रशासनाची मदत पोहचण्यास अडथळा होईल अशी कृती करणे, हुल्हड़बाजी करणे 5. धोकादायक वाडे, ठिकाणे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी प्रशासनकडून हलाविताना प्रशासनास विरोध करणे.

या कृत्यांमुळे जिवित हानी व वित्तहानी होऊ शकते म्हणून नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात CRPC 144 चे मनाई आदेश लागु करण्यात आले आहेत.

सदर आदेशाचा भंग करण्याविरुद्ध IPC 188 प्रमाणे गुन्हे दाखल करून करवाई करण्यात येईल याबाबत सर्वानी नोंद घ्यावी.तसेच सदरची माहिती आपले मित्र नातेवाईक यांना देऊन सध्याच्या पुर परिस्थितिमुळे जीवीत अथवा वित्त हानी होणार नाही या कामी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!