Video : दुसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी फेरीसाठी २५ हजार भाविकांची गर्दी

0
त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे/देवयानी ढोन्नर) | त्र्यंबकेश्वरमध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून अंदाजे २५ हजार भाविकांनी ब्रह्मगिरीची फेरी पूर्ण केली.

अनेक भाविक रविवारी रात्रीच त्र्यंबकेश्वरात मुक्कामी आलेले होते. ते पहाटेच्या सुमारास प्रदक्षिणेसाठी रवाना झाले होते.

या फेरीला जवळपास ७-८ तास लागतात. यावेळी बम बम भोले, जय भोले, हर हर महादेव अशा घोषणा ऐकण्यास मिळत होत्या. दुसऱ्या सोमवारच्या प्रदक्षिणेसाठी महिलांची लक्षणीय गर्दी बघावयास मिळाली.

पेगलवाडी प्रयाग तिर्थचे दर्शन घेऊन पहिने बारी मार्गे पुढे वैतरणा गणेश मंदिरात दर्शन, वैतरणा नदीत स्नान,  राम तीर्थ गौतम धस पार करीत नमस्कार मार्गे गणेश बारीतून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा ओघ वाढत होता.

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनेक भाविकांनी फेरी पूर्ण करून त्र्यंबक गाठले. 725 वर्षांपूर्वी संत निवृत्ती नाथांनी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा केली अशी पौराणिक माहिती आहे त्यापूर्वीही प्रदक्षिणा आहे.

 

 

Video : Deoyani Dhonnar, Deshdoot Trimbakeshwar

LEAVE A REPLY

*