Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedपीकविमा धारकांना पावणे सव्वीस कोटींची भरपाई

पीकविमा धारकांना पावणे सव्वीस कोटींची भरपाई

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

गेल्या वर्षभरात नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural disasters) विविध पिकांचे नुकसान (Crop damage) झालेल्या जिल्ह्यातील 70 हजार 916 शेतकर्‍यांना (farmers) पीकविम्यापोटी (Crop insurance) 25 कोटी 73 लाखांची भरपाई मिळाली आहे.

- Advertisement -

सर्वाधिक भरपाईची रक्कम मालेगाव तालुक्यातील (malegaon taluka) शेतकर्‍यांना (farmers) तर सर्वांत कमी रक्कम इगतपुरी तालुक्यातील (igatpuri taluka) शेतकर्‍यांना मिळाली आहे. दरम्यान, शेतकरी संख्या आणि नुकसानभरपाईची (indemnification) रक्कम पाहता पीक विमा काढूनही शेतकर्‍यांना काहीही फायदा होत नसल्याचे दिसते. यामुळे अनेक शेतकरी पीक विम्याकडे पाठ फिरवत असल्याचे दिसते.

नाशिक तालुक्यात (nashik taluka) 15 भात उत्पादक शेतकर्‍यांना एकूण 62 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली असून, या रकमेचे समान वाटप केले तर प्रत्येक शेतकर्‍याला 4 हजार 933 रुपये इतकीच रक्कम मिळाली. विमा कंपनीकडून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना व्यक्त होत आहे.

सर्वाधिक पाऊस (rainfall) पडणार्‍या इगतपुरी तालुक्यात उडीद पिकविणार्‍या एका आणि भुईमूग पिकविणार्‍या 2 शेतकर्‍यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना पीक विमा कंपनीकडून (Crop Insurance Company) केवळ दोन हजार रुपये भरपाईपोटी देण्यात आले आहेत.

उडीदसाठी 400 तर भुईमुगासाठी 700 रुपये हप्ता आकारण्यात आला होता. मालेगाव तालुक्यात कापूस, मूग, भुईमूग, मका, कांदा. बाजरी, तूर, ज्वारी आदी पिकांचे नुकसान (Crop damage) झाले. 36 हजार 887 शेतकर्‍यांनी नुकसानभरपाईचा दावा केला होता. त्यांना एकूण 1423.61 लाख रुपये इतकी नुकसानभरपाई मिळाली आहे. तर येवल्यातील अनेक शेतकर्‍यांनी विविध पिकांचा विमा काढला होता.

1823 शेतकरी नुकसानभरपाई (indemnification) मिळण्यासाठी पात्र ठरले. त्यांना 49 लाख 33 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. त्यात मका उत्पादक शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. 726 मका उत्पादकांना 22 लाख 45 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. भुईमुगाच्या पिकासाठी विमा कंपनीने शेतकर्‍यांकडून 700 रुपयांप्रमाणे हप्ता जमा केला होता. जिल्ह्यातील 1,423 शेतकर्‍यांना भुईमुगाची भरपाई मिळाली आहे. त्यात सर्वाधिक संख्या नांदगाव तालुक्यातील शेतकयांची आहे. 867 शेतकर्‍यांना 11 लाखांची भरपाई मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या