अहमदनगर : क्रॉम्प्टन क्रिकेट करंडक : साईचा 2 गडी राखून विजय 

0
अहमदनगर : साईदिप हिरोजने पुणे येथील द क्रिकेटर्स संघावर दोन गडी राखून विजय मिळविला. क्रिकेटर्सने दिलेले 111 धावांचे आव्हान साईने 23 षटकांत 8 गड्याच्या बदल्यात पूर्ण केले. मॅन ऑफ दि मॅच म्हणून साईचा गोलदांज  अनिकेत सिंग याला गौरविण्यात आले.
वाडिया पार्क येथील मैदानवर जिल्हा किक्रेट असोसिएशन व क्रॉप्टन ग्रीव्हज लि. यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या कालाचा सामना साईदिप विरूध्द द क्रिकेटर्स पुना यामध्ये खेळविण्यात आला. नाणेफेक जिंकत प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय क्रिकेटर्सने घेतला. सलामीला उतरलेल्या गौरव शिंदे व शिंवेद्र भुजबळ या जोडी संघाला चांगल सुरूवात करून देण्यात अपयशी ठरली. गौरव शिंदे यांने 26 तर शिंवेद्र भुजबळ यांने 19 धावा करत सलमीची जोडी माघारी परतली. यानंतर उरतलेले एक-एक फलदांज माघारी परतत होते.साईच्या अनिकेत सिंग यांने क्रिकेटर्स संघाचे कंबरडेच मोडले. त्यांने 7 षटकांत 18 धावाच्या बदल्यात 4 गडी बाद केले. त्यामुळे क्रिकेटर्सचा डाव गडगडला. यश कोयंडे व क्षितीज पाटील यांनी धावफलक हलता. ठेवण्यात अपयशी ठरले. यशने 19 ते क्षितीज पाटील यांनी 18 धावांची भर घालत तो बाद झाला. क्रिकेटर्सचा संपूर्ण डाव 29 षटकांत 111 धावांत आटोपल. साईच्या सर्व गोलदांजानी अचूक टप्प्यावर गोलदांजी करत क्रिकेटर्सला रोखले. मोहित यादव, कमल मुनी, अमित यादव, जयपाल रंधावा यांनी प्रत्येक 1 गडी बाद केला.
क्रिकेटर्सने दिलेले 111 धावांचे आव्हान मैदानात उतरलेल्या साईदिपची सुरूवात चांगली होती. अर्पित गौतम व अनिकेत सिंग यांनी धावफलक हलता ठेवत. संघाला चांगली सुरूवात करून दिली. अनिकेत आक्रमक फलदांजीच्या नादात तो केवळ 20 तर अर्पित गौतम केवळ 24 धावांवर दोघे बाद झाले. सलामीची जोडी माघारी परताल्यानंतर संघाचा डाव थोडाफार प्रमाणात गडगृडला. मधल्या फळीतील फलदांजानी कसाबसा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र क्रिकेटर्सच्या क्षितीज पाटील गोलदांजी करताना फलदांजाना कोणतीच संधी देत नव्हाता. त्यांने मधल्या फळीतील 4 फलदांज टिपले होते. त्यामुळे साईच्या संघात थोडी अस्वस्था पसरली होती. सारंश भार्गव आणि अमित यादव या दोघांनी खिंड लढविली. त्यांनी धावफलक हलता ठेवत संघाला 23 षटकांत संघाला विजय प्राप्त करून दिला. सारांश यांने 17 तर अमितने 16 धावा केल्या. गोलदांजी करतांना क्रिकेटर्सच्या गोलदांज साईच्या फलदांजाना रोखू शकले नाही. स्वप्निल इंगळे व सत्यजित नायक यांनी प्रत्येक दोन गडी टिपले.
या सामन्याचा सामनावीर म्हणून साईदिप हिरोजचा अनिकेत सिंग यांला गौरविण्यात आले.
संक्षिप्त धाव फलक 
द किकेटर्स 29.3 षटकांत सर्व बाद 111 धावा
गौरव शिंदे 26, शिवेंद्र भुजबळ 20, यश कोयंडे 19, क्षितीज पाटील 18.
अनिकेत सिंग 7/4, मोहित यादव 1/1, कमल मुनी 8/1, अमित यादव 7/1, जयपाल रंधावा 3/1
साईदिप हिरोज 23.1 षटकांत 8 बाद 116 धावा.
अर्पित गौतम 24, अनिकेत सिंग 20, सारांश भार्गव 17, अमित यादव 16. 
क्षितिज पाटील 5/4, स्वप्निल इंगळे 8/2, सत्यजित नायक 7/2.

LEAVE A REPLY

*