मंत्र्याच्या बॉडीगार्डच्या शोधात पोलीस

0

चौकशीत आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरीतील तरुणीवर अत्याचार करुन गर्भपात केल्याचा आरोप एका मंत्र्याच्या बॉडीगार्डवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बॉडीगार्ड पसार झाला असून त्याच्या मागावर तपासी अधिकारी सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांचे पथक रवाना झाले आहे. या गुन्ह्यात अनेकांची नावे असून तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

गणेश रामदास अकोलकर या बॉडीगार्डने एका तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केला होता. या दरम्यान ही तरुणी गरोदर  राहिली. तिची फसवणुक करुन अकोलकरने तिचा गर्भपात केला. या प्रकरणात आत गणेशसह गर्भपात करणारे डॉक्टर देखील चौकशीच्या भोवर्‍यास सापडण्याची शक्यता आहे. तसेच या तरुणीला गणेशच्या नातेवाईकांनी घरी नेऊन मारहाण केली होती.

तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे चौकशीत नेमके किती जणांना आरोपी करतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. तसेच पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की; एका वकीलाच्या मदतीने खोटी माहिती लेखी घेऊन पिडीत मुलीची बळजबरीने सही घेण्यात आली.

तसेच या घटनेत काही डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते व अन्य व्यक्तींचा सामावेश आहे. हा तपास आयपीएस अधिकारी अक्षय शिंदे यांच्याकडे असल्यामुळे या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात किती व्यक्तींना आरोपी करण्यात येणार आहे. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 पैशाच्या नावाखाली मला बदनाम केले – अत्याचार झाल्यानंतर मला आरोपी हा विवाहीत असल्याचे समजले. तरी देखील मी सांगितले होते. मी तुझ्या संसारात हस्तक्षेप करणार नाही. मात्र आरोपीने मला धमक्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मी तडजोड करण्यासाठी मोठी रक्कम मागते अशी अफवा केली. त्यामुळे मला कोणाची तडजोड नको. माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यामागे कोणी नसूनही मी गुन्हा दाखल केला आहे. मला न्याय हवा आहे अशी प्रतिक्रीया पिडीत मुलीने दिली.

पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई होणार? – पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई होणार? आरोपी हा एका मंत्र्याचा बॉडीगार्ड आहे. त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत त्याला प्रशासनाने पाठीशी घातले नाही. मात्र अत्याचार होऊन, गर्भपात करण्यात आला हे माहित असताना देखील वाहतूक शाखेच्या एका कर्मचार्‍याने अर्थपुर्ण तडजोडीसाठी मध्यस्ती केल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे. त्यामुळे आरोपीला सहाय्य करणे हा गुन्हा असून त्याच्यावर कारवाई होईल का असे प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

*