बनावट कागदपत्रांच्या आधारे जागेची विक्री : चौघांवर गुन्हा दाखल

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी परिसरात नित्यसेवा लॉनच्या मागे असणार्‍या जागेची बनावट कागदपत्रे व खोटा व्यक्ती उभा करत दोघांची फसवणुक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी चार जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मुरलीधी कोतकर (रा. कोतकरवस्ती), आकाश प्रमोद आठवले (रा. नित्यसेवा कॉलनी सावेडी), प्रिती राहुल शिंदे (रा. वडगाव गुप्ता), विश्‍वनाथ नाना तवले (रा. नेवासा) अशा चौघांना आरोपी करण्यात आले आहे.
दिपक नरसय्या बुरम (रा. चितळेरोड) यांना जागा घ्यायची होती. आरोपींनी यांनी बुरम यांच्याशी संपर्क करत औरंगाबाद येथील एका व्यक्तीच्या नावे असणारी जागा आरोपींनी बुरम यांना दाखविली. बुरम यांना जागा पसंत पडल्याने त्यांनी आरोपींना एक लाख रूपये दिले. मात्र, काही दिवसानंतर वेगवेगळी कारणे पुढे करत आरोपींनी ही जागा विक्री करण्यास मालकाचा नकार असल्याचे सांगितले.
त्यावर बुरम यांनी दिलेल्या एक लाख रुपयांची मागणी आरोपींकछे केली. त्यावर पैसे देण्यास टाळाटाळ झाली. आरोपींनी बुरम यांना धनादेश दिले. मात्र आरोपींच्या खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश बाऊंस झाला. पैशाचा तगादा टाळण्यासाठी आरोपींनी बुरम व त्यांच्या मित्रास दुसरी जागा दाखविली. एका पुण्याच्या महिलेच्या जाग्यावर असणारी जागा आपलीच असल्याचे भासवून त्यांनी एका खोट्या महिलेस उभे केले.
बनावट कागदपत्रे तयार करुन तीन ते चार लाखांचा व्यवहार करण्यात आला. या दरम्यान, काही बाबींचा संशय आल्याने बुरम यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.

…………………

विद्यार्थ्यांच्या मोबाईलची चोरी
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील वाघमाळा येथे शिक्षणासाठी आलेल्या प्रमोद मधुकर घोरपडे (रा. वैजुबाभळगाव, ता. पाथर्डी) यांचा मोबाईल घरातून चोरी गेल्याची घटना बुधवारी (दि.14) रोजी दुपारी घडली. 10 हजार पाचशे रुपयांच्या मोबाईलसह अन्य वस्तु घरातून चोरी गेल्या आहेत. मोबाईलशी झटापट करणार्‍याचे फोटो दुसर्‍या मोबाईलवर येतील असे ऍप या मोबाईलमध्ये आहे. चोरी करणारा आरोपी दुसर्‍या मोबाईलमध्ये दिसत असल्याचे फोटो पोलिसांना देण्यात आले. मात्र या विद्यार्थ्याची कैफीत एकण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे या विद्यार्थ्यांने सांगितले. याप्रकरणी राजकीय व्यक्तींच्या दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तरटे करीत आहेत.
————

LEAVE A REPLY

*