Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रबोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल

बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल

मुंबई –

राज्यातील शेतकर्‍यांना बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

- Advertisement -

यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले आहे.

सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी गेल्या रब्बी हंगामात एका कंपनीमार्फत सप्टेंबर, 2020 कालावधीत सुमारे 8 टन कांदा बियाणे खरेदी केले होते. मात्र या कांदा बियाण्यांची उगवण न झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत निवेदनाद्वारे संबंधित शेतकर्‍यांनी कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यमंत्री डॉ. कदम यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली.

कृषी राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, शेतकर्‍यांना गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. याबरोबरच काही कंपन्या जर शेतकर्‍यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक करत असतील तर कृषी विभागाच्या वतीने अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या