Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विवाहित महिलेची छेड, पतीवरही वस्तार्‍याने हल्ला

Share
अवैध दारूविक्री; जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई, Latest News Illegal Alcohol Sales Action Akole

तरुणाविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असलेल्या महिलेला रस्त्यात अडवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करत विनयभंग करण्यात आला. महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवर तरूणाने वस्तर्‍याने हल्ला करून त्यालाही जखमी केले. बालिकाश्रम रोड येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादीवरून नीलेश तुळशीराम गायकवाड याच्याविरुध्द तोफखाना पोलिस स्टेशनला विनयभंग करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गायकवाड हा फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. चोवीस वर्षीय महिला ही सोमवारी सकाळी बालिकाश्रम रोडने मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होती. नीलेश गायकवाड याने महिलेचा घरापासूनच पाठलाग केला. रस्त्यामध्ये महिलेला थांबवून तिचा मोबाइल नंबर मागितला. महिलेने मोबाइल नंबर देण्यास नकार दिल्यानंतर गायकवाड याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्यावेळी महिलेला मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर गायकवाड पळून गेला. महिलेने झालेल्या प्रकार आपल्या पतीला सांगितल्यानंतर ते जाब विचारण्यासाठी गायकवाड याच्या घरी गेले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर गायकवाड याने वस्तार्‍याने महिलेच्या पतीवर हल्ला केला. त्यात महिलेचा पती जखमी झाले. त्यानंतर गायकवाड हा पळून गेला. महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!