Type to search

Featured सार्वमत

नगर: परप्रांतीय महिलेवर अत्याचार

Share
अवैध दारूविक्री; जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई, Latest News Illegal Alcohol Sales Action Akole

एमआयडीसीचा मटका बुकी अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – कंपनीत नोकरीला लावून देतो असे सांगून महिलेवर अत्याचार केल्याची घटना एमआयडीसी भागात घडली. गत तीन वर्षापासून अत्याचार करणार्‍या मटका बुकीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

जितेंद्र रमेश पाटोळे (रा.शिवाजीनगर, नवनागापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पाटोळे याचा एमआयडीसी भागात मटका बुकीचाही धंदा असून त्याचे मोठे नेटवर्क आहे. मटक्याच्या गुन्ह्यातही पोलिसांनी त्याला पूर्वी अटक केली होती. आता त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. नवनागापूरच्या स्नेहनगर येथील महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पिडित महिला ही मुळची उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील आहे. डिसेंबर 2016 पासून पाटोळे हा तिच्यावर अत्याचर करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एमआयडीसीतील कंपनीत नोकरीला लावतो, त्यासाठी माझ्यासोबत मुलाखतीला चल असे म्हणून त्याने पिडितेला कारमध्ये नेले. माझ्याशी शरीरसंबंध ठेव नाहीतर तुला अन् तुझ्या मुलांना जीवे ठार मारू अशी धमकी देत अत्याचार केला. गत तीन वर्षापासून तो अत्याचार करत असल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच पाटोळे याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!