Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

रस्ता लूट करणार्‍या दोघांना अटक

Share

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-सोलापूर रोडने सांगोला येथे द्राक्ष आणण्यासाठी जाणार्‍या ट्रकला (डब्ल्यू-11-डी-3674) पाटेवाडी शिवरात मारहाण करून लुटणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भाऊसाहेब उत्तम महानोर (वय-30 रा. पाटेकर ता. कर्जत) व अनिल नामदेव माने (वय- 24 रा. माळीजळगाव ता. कर्जत) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

सद्दाम सलीम शेख (वय-24 रा. झारखंड) हे नगर-सोलापूर रोडने सांगोला येथे जात असतात ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने थांबले असता, त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील सहा हजार 700 रुपये लुटले होते. त्यांनी याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली, हा गुन्हा महानोर व माने यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस हवालदार बबन मखरे, दत्ता हिंगडे, पोलीस नाईक संदीप पवार, रविंद्र कर्डीले, योगेश सातपुते, रवी सोनटक्के, सचिन कोळेकर यांनी केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!