Friday, April 26, 2024
Homeनगरकत्तलीसाठी गायी वाहतूक करणारा पिकअप पकडला

कत्तलीसाठी गायी वाहतूक करणारा पिकअप पकडला

तळेगाव दिघे चौफुलीवरील घटना

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुलीवर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कत्तलीसाठी गायी घेऊन निघालेला पिकअप पकडला. पोलीस पथकाने टेम्पोसह चार जर्सी गायी ताब्यात घेत दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी तसेच पोलीस नाईक बाबा खेडकर, अनिल जाधव, दत्तात्रय वाघ व ओंकार शेंगाळ हे सरकारी वाहनाने गस्त घालत असताना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास तळेगाव दिघे चौफुलीवर आरोपी जाकीर रशीद शेख (वय-38 रा. कुरण, ता. संगमनेर) हा त्याच्या ताब्यातील पिकअप क्रमांक एम.एच 12, एफडी 2280 मधून चार गायी क्रूरतेने यातना होतील अशा रितीने कोंबून त्यांना अन्न पाण्याची सुविधा उपलब्ध न करता वाहतूक करताना आढळून आला. 2 लाख किंमतीच्या पिकअपसह 40 हजार रुपये किंमतीच्या चार जर्सी गायी असा 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी पोलीस नाईक अनिल पोपट जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 558/19 अन्वये प्रांण्याना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणारे अधिनियम 1960 चे कलम 11(1), (ड), (ह), (ई) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी जाकिर रशीद शेख यास पोलिसांनी अटक केली आहे.

पकडलेल्या गायी पोलिसांनी कर्‍हेघाट येथील जीवदया मंडळाच्या पांजरपोळ येथे हलविल्या. पोलीस निरीक्षक सुनील पाटील व पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या