अट्टल दरोडेखोर भोसलेला मोरेचिंचोरेत अटक

0

गंगापूर व सोनईत गुन्हे

सोनई (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथील रहिवाशी असलेला व दरोडेखोरीत अट्टल समजला जाणारा आरोपी सचिन फुलचंद भोसले याला सोनई पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्यावर सोनईसह गंगापूर व अन्य ठिकाणी दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल आहेत.
दरोड्यांच्या गुन्ह्यात गंगापूर व सोनई पोलिसांना हवा असलेला आरोपी सचिन फुलचंद भोसले हा त्याच्या गावी आलेला असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पथकासह मोरेचिंचोरा हद्दीत सापळा रचून  सचिन भोसले याला ताब्यात घेऊन अटक केली.

अटक केलेल्या आरोपीवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 80/2018 भारतीय दंड विधान कलम 399, 402, 34 दाखल आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 166/2018 भारतीय दंड विधान कलम 395, 120(ब) असे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर इतर अन्य ठिकाणच्या अनेक गुन्ह्यात तो फरार होता. आता सोनई पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याच्याकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सोनईच्या पोलीस पथकात हेडकॉन्स्टेबल हुनमंत गर्जे, हेडकॉन्स्टेबल भटूअण्णा कारखिले, हेडकॉन्स्टेबल गावडे, पोलीस नाईक शिवाजी माने, किरणकुमार गायकवाड, कॉन्स्टेबल बाबा वाघमोडे, काका मोरे, विठ्ठल थोरात, अमोल भांड, आदिनाथ मुळे, सचिन ठोंबरे यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

*