Friday, April 26, 2024
Homeनगरया कारणावरून पती-पत्नीच्या डोक्यात कवचा मारला

या कारणावरून पती-पत्नीच्या डोक्यात कवचा मारला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील टाकळीभान या ठिकाणी भावाच्या घरी ठेवलेले विकत आणलेले पत्रे घेण्यासाठी गेले असता त्याच्या वडिलांना राग येवून वडिलांनी व भावाने शिवीगाळ करत मारहाण केली व त्याच्या व पत्नीच्या डोक्यात लोखंडी कवचा मारुन जखमी केले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात वडील व भावाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

टाकळीभान, कोंबडीवाडी या ठिकाणी राहणार्‍या परसराम एकनाथ सावंत तसेच भाऊ व वडील आचार्‍याचे काम करतात. परसरामला त्याच्या घराच्या पुढे पत्र्याचे शेड करावयाचे असल्याने पसररामने मागच्या महिन्यात पत्रे आणून वडीलांच्या घरी ठेवले होते. दि. 16 जानेवारीला. सकाळी 10 वा. परसराम त्याचे पत्रे आणायला गेला असता त्याचा वडीलांना राग आल्याने त्यांनी परसरामला वाईट वाईट शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात लोखंडी कवचा मारून जखमी केले.

त्यावेळी परसरामची पत्नी मंगलही मध्ये पडून वाद सोडवायचा प्रयत्न करीत असताना परसरामच्या पत्नीच्या डोक्यातही गज मारून तिलाही जखमी केले. दोघे पती पत्नी दोघे जखमी झाल्यानंतर औषधोपचारासाठी त्यांना अ‍ॅडमीट करण्यात आले.

सदर परसराम सावंत यांच्या फिर्यादीवरून त्यांचे वडील एकनाथ यादव सावंत, भाऊ राजेंद्र एकनाथ सावंत यांच्याविरूद्ध भादंवि कलम 323, 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या