डोक्यात बिअरची बाटली फोडली तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथे थांबू नको, निघून जा, असे म्हणत एकास शिवीगाळ करून डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना वाकडी फाटा येथील बस स्टॅन्डसमोर घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील वाकडी फाटा येथील बस स्टॅन्डजवळ तुषार बाळासाहेब शेळके (वय 28, धंदा-शेती, रा. शेळकेवस्ती, वाकडी, ता. राहाता) हा उभा असताना त्याच्या भावकीतील आनंद शेळके, अक्षय शेळके, संतोष शेलार यांनी तेथे येवून, तू येथे थांबू नको, येथून निघून जा, असे म्हणत शिवीगाळ करून तुषार शेळकेच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तसेच काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी तुषार बाळासाहेब शेळके याने श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी आनंद लक्ष्मण शेळके, अक्षय बाबासाहेब शेळके (दोघे रा. शेळकेवस्ती, वाकडी) व संतोष कारभारी शेलार (रा. जळगाव, ता. राहाता) यांच्याविरूद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्री. आडांगळे पुढील तपास करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *