Saturday, April 27, 2024
Homeनगरजेवण लवकर न दिल्याने हॉटेलातील कुकला भट्टीवर ढकलले

जेवण लवकर न दिल्याने हॉटेलातील कुकला भट्टीवर ढकलले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जेवण लवकर न दिल्याने हॉटेलातील कुकला भट्टीवर ढकलून दिले. त्यात कुक भाजून गंभीर जखमी झाला. तालुक्यातील भेर्डापूर गावातील तोरणा हॉटेलमध्ये काल सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर गावात तोरणा हॉटेल असून त्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी (कूक) म्हणून मोहनसिंग हारकसिंग सोनार (वय 40, रा. कर्मचारी वसाहत ऑफिस, एमआयडीसी श्रीरामपूर) हा काम करतो. तो हॉटेल तोरणामध्ये किचनरूममध्ये गॅस भट्टीजवळ जेवणाच्या ऑर्डरप्रमाणे जेवण तयार करत असताना महेश जगताप (रा. भेर्डापूर) हा स्वयंपाक खोलीत आला व मोहनसिंग सोनार यास म्हणाला की, तुला लवकर जेवणाची ऑर्डर मारता येत नाही का, असे म्हणून पाठीवर जोरात हाताने थाप मारू चालू गॅसभट्टीवर ढकलून दिले. त्यामुळे स्वयंपाकी मोहनसिंग सोनार यांचा शर्ट पेटला व त्याच्या हाताला, छातीला, मानेला व कानाजवळ भाजून तो जखमी झाला. याप्रकरणी मोहनसिंग हारकसिंग सोनार याने श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या