Thursday, April 25, 2024
Homeनगरवाळूच्या हिशोबावरून हाणामार्‍या

वाळूच्या हिशोबावरून हाणामार्‍या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील बेलापूर येथे वाळूच्या पैशाच्या हिशोबावरून वाळू तस्करांमध्ये बाचाबाचीनंतर हाणामारीची घटना घडली.

- Advertisement -

त्यात एक जण जखमी झाला. त्याला साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काल बेलापूर-राहुरी फॅक्टरी रोडवर एका ठिकाणी वाळूच्या पैशाच्या हिशोबावरून वाद झाले. कोणाच्या गाड्या फुकट चालू द्यायच्या किंवा नाही? तसेच कोणाच्या गाड्यांचे पैसे उधार राहिले? यावरून या ठिकाणी हिशोब सुरू होता.

यावेळी प्रमुख मंडळी उपस्थित होती. त्यावेळी गावातील स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी आले. प्रमुख मंडळींनी या तरुणांंना उधार गाड्या चालणार नाही, रोख पैसे द्या असे म्हणत सुनावले. त्यावरून वाद वाढला. त्याचे

रुपांतर हाणामारीत झाले. काही क्षणात एकाने खुर्ची उचलून एकाच्या डोक्यात मारली. त्यात पढेगाव येथील एक जण जखमी झाला. त्याला येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. वाळूतून मिळालेल्या वारेमाप पैशामुळे गुन्हेगारांमध्ये आतापर्यंत अनेकदा टोळीयुद्ध झाले आहे. काल झालेल्या हाणामार्‍याही वाळूच्या हिशोबावरून झाल्याने अवैध मार्गाने वाळूतून मिळणार्‍या पैशामुळे सामाजिक अशांतता निर्माण होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या