Type to search

गंठण चोरी : श्रीरामपूरच्या चौघांना 10 वर्षे सक्तमजुरी

Featured सार्वमत

गंठण चोरी : श्रीरामपूरच्या चौघांना 10 वर्षे सक्तमजुरी

Share
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरामध्ये साखळी चोर्‍या करून धुमाकूळ घालणार्‍या टोळीतील पाचजणांना 10 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कर्‍हाळे यांनी सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. यातील चार आरोपी श्रीरामपुरातील इराणी गल्ली येथील आहेत.

सज्जाद गरीबशा पठाण उर्फ इराणी (वय 30), मुस्तफा फते इराणी (वय 30), शब्बीर मिरिकन शेख उर्फ इराणी (वय 24), अलिम शकील पठाण (वय 21, चौघेही रा. श्रीरामपूर) व सलीम अब्दुल शेख (वय 32, रा. भुसावळ, जि.जळगाव) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

याबाबत भवानी पेठ येथे राहणार्‍या 54 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. दि. 30 मार्च 2014 रोजी सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास भवानी पेठ परिसरात ही घटना घडली. फिर्यादी ही भवानी पेठ परिसरातील नेहरू रस्त्यावरून पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकी, चारचाकी मधून आलेल्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीच्या सोन्याची चोरी केली.

त्यानुसार याप्रकरणी खडक पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले त्यावर सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर शहरात साखळी चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!