श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात धोंडीबा गणपत सोनावणे यांच्या गट नंबर 7 ब मध्ये तीस गांजाची झाडे पोलीस कारवाईत जप्त करण्यात आली.
साडेसात किलो वजनाचा हा गांजा अंदाजे 37 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या पथकाने टाकळी कडेवळीत मधील सोनावणे यांच्या गट न 7 ब मधील शेतात तीस गांजाची झाडे होती. छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
यात साडेसात किलो गांजा सापडला याची किंमत 37 हजार पाचशे रुपये आहे. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. श्रीगोंदा पोलिसांच्या पथकबरोबर तहसीलदार प्रदीप पवार, तालुका कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के उपस्थित होते. संबंधित शेतात मोठी गांजाची झाडे सापडली असल्याने गावात मोठी चर्चा होती.