Friday, April 26, 2024
Homeनगरधक्कादायक! नराधम सासऱ्याने केली सुनेची हत्या, चिमुकल्या नातीलाही संपवलं

धक्कादायक! नराधम सासऱ्याने केली सुनेची हत्या, चिमुकल्या नातीलाही संपवलं

शेवगाव | शहर प्रतिनिधि

तालुक्यातील मजलेशहर येथे एका विवाहित महिलेची तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह निर्घुण हत्या झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऋतुजा संतोष लोढे (वय २४), कुमारी संस्कृती संतोष लोढे (वय २) अशी मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

मयत महिलेचे चुलते जनार्धन नारायण मगर (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मयत महिलेचा सासरा कारभारी ज्ञानदेव लोढे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे.

जवळ्यात धाडसी दरोडा… महिलांना मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास

याबाबत जनार्धन मगर यांनी पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, कारभारी ज्ञानदेव लोढे हे आपली पत्नी मंदा, मुले किशोर, संतोष तसेच सून ऋतुजा व नात संस्कृती यांच्यासह मजलेशहर गावापासून १ किमी अंतरावर शेतामध्ये राहतात. काल गुरुवारी घरातील सर्वजण शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते.

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण

सून व नात अशा दोघी घरामध्ये होत्या. रात्री ७.३० च्या सुमारास सासरे कारभारी याने सून ऋतुजा व नात संस्कृती यांचा गळा दाबून मारून टाकले. शेतातील कामे आटोपून इतर सर्वजण घरी आल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. कारभारी लोढे हे यावेळी घरामध्येच बसून होते.

घटना लक्षात आल्यानंतर मुलगा संतोष याने आरडाओरड केली त्यानंतर नातेवाईकानी ऋतुजा व संस्कृती यांना शेवगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Akanksha Dubey मृत्यूप्रकरणात ‘या’ गायकाला गाझियाबादमधून अटक

या घटनेच्या मागील कारणाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल हे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या