Type to search

Featured सार्वमत

नगर: मुकुंदनगरचे ‘भाई’ जेल मे!

Share

एमपीडीए अंतर्गत पोलीस कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगरच्या कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणार्‍या दोघा भाईंना पोलिसांनी जेलमध्ये टाकले आहे. नगरसेवक समदखान आणि नगरसेविका पूत्र बाबा खान अशी एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेल्या दोघा भाईंची नावे आहेत. एक वर्षासाठी त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे.

कारवाई झालेले समद वहाब खान हे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक असून शेहबाज ऊर्फ बाबा ऊर्फ बाबा अंडा जाफर खान हा नगरसेविका पुत्र आहे. दंगल, सरकारी कामात अडथळा आणि खुनी हल्ला असे गुन्हे या दोघांविरोधात दाखल असल्याने त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारीची (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश एसपी ईशू सिंधू यांनी दिले होते.त्यानुसार एलसीबीने प्रस्ताव तयार करत तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला होता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दोघांना एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचा निर्णय दिला. या दोघांना तत्काळ ताब्यात घेत पोलिसांनी थेट नाशिक सेंट्रल जेलमध्ये टाकले.

गुन्हेगारी जंत्री
बाबा खान आणि समद खान यांच्यात वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे मुकुंदनगरची शांतता धोक्यात आली होती. दोघांविरोधात भिंगार पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्याचा आधार घेत ही कारवाई करण्यात आली आहे. बाबा खान विरोधात सरकारी कामात अडथला आणल्याचा गुन्हा सिध्द झाला असून समद खानच्या गुन्ह्याची सुनावणी अजून सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!