चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पोटाला दगड बांधून तलावात टाकले

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पोटाला दगड बांधून तलावात टाकले

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील वाघवाडी येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

महिलेच्या पोटाला दगड बांधून तिला तलावात टाकून देण्यात आले होते. नंदा पोपट जाधव असे मयत महिलेचे नाव असून आरोपी पोपट जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पोपट जाधव याला मंगळवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी जाधव हा वाघवाडी येथे मजुरीचे काम करत होता.

याबाबत सविस्तर असे की, चार वर्षापूर्वी मयत नंदा जाधव यांचा पोपट जाधव याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर अपत्य होत नसल्याने आरोपी पोपट जाधव पत्नी नंदा हिला नेहमी त्रास देत असे. गेल्या पाच महिन्यांपासून नंदा जाधव गरोदर होती. ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर आरोपी पोपट जाधव तिच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा. याच कारणाने त्याने दि. 30 मार्च रोजी नंदा जाधव हिच्या पोटाला दगड बांधून तलावात टाकून दिले. त्यानंतर रविवारी ही घटना उघडकीस आली.

याबाबतची मयत नंदा जाधव हिच्या भावाच्या फिर्यादीवरून पारनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोपट जाधव घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली असून त्याने हत्येची कबुली दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक घनशाम बळप करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com