Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवाशात 4 क्विंटल मांसासह 21 गोवंश जनावरे पकडली

नेवाशात 4 क्विंटल मांसासह 21 गोवंश जनावरे पकडली

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून 4 क्विंटलहून अधिक गोमांस तसेच कत्तल्लीसाठी बंदी असलेली 21 जनावरे व स्विफ्ट कार असा गोवंश जनावरे, 495 किलो मांसाचे तुकडे व एक स्विफ्ट कार असा 5 लाख 12 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारांकडून नेवासा येथे जनावरांची कत्तल व कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची बातमी मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार संजय खंडागळे, हवालदार सुरेश माळी, कॉन्स्टेबल मयुर गायकवाड, रोहित येमुल, चालक हवालदार चंद्रकांत कुसळकर, आरसीपी पथकातील उपनिरीक्षक ज्ञानदेव पवार व इतर 15 अंमलदार सर्व पोलीस मुख्यालय, अहमदनगर यांना याबाबत माहिती दिली व कारवाई करणे बाबत सूचना देऊन वरील सर्वांचे पथक तात्काळ रवाना केले.

पथकाने खाटीक गल्ली ता. नेवासा येथे जाऊन खात्री केली असता इसम अबू चौधरी याच्या घराची पहाणी करता त्याच्या घरात दोन इसम जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस कापून तुकडे करताना दिसले. दोन्ही इसमांना जागीच पकडून पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अबु शहाबुद्दीन चौधरी (वय 58) व मोजु अबू चौधरी (वय 25), दोन्ही रा. खाटीक गल्ली, ता. नेवासा असे सांगितले. त्यांच्याकडून 34 हजार 400 रुपये किंमतीचे 215 किलो गोमांस, एक हजार रुपये किंमतीची कापलेली कातडी व दोन लोखंडी सत्तूर असा एकूण 35 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेतले.

त्याच दरम्यान पथकाने खाटीक गल्ली, ता. नेवासा येथील जबी चौधरी याचे घराची पहाणी करता त्याच्या घरात एक इसम जनावरांची कत्तल करून गोमांस कापून तुकडे करताना दिसला. त्यास जागीच पकडून पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जबी लतीफ चौधरी (वय 28) रा. खाटीक गल्ली, ता. नेवासा असे सांगितले. त्याच्याकडून 32 हजार रुपये किंमतीचे 200 किलो गोमांस व एक लोखंडी सत्तूर असा एकूण 32 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या तिन्ही इसमांना कोठे ब कोणत्या वाहनांमध्ये गोमांस विक्रीकरिता नेले जाते अशी विचारणा करता त्यांनी इसम नामे नदीम चौधरी यांचे बोलेरो ब स्विफ्टकार मधून गोमांस विक्री करिता नेत असल्याचे सांगितले. सदर इसमाचा व वाहनांचा परिसरात शोध घेताना अचानक एक बोलेरो गाडी भरधाव वेगात चालवित एक इसम घेऊन जाताना दिसला. त्यास थांबण्याचा इशारा केला परंतु तो थांबला नाही. सदर इसमाचे नाव विचारले असता ताब्यातील आरोपींनी त्याचे नाव नदीम चौधरी रा. खाटीक गल्ली, ता. नेवासा (फरार) असे सांगितले. त्यावेळी जवळच एक पांढर्‍या रंगाची स्विफ्ट कार उभी असल्याने त्या बाबत विचारपुस करता ती बोलेरो घेऊन गेलेल्या आरोपीच्या मालकीची असल्याची माहिती मिळाल्याने 3 लाख रुपये किंमतीची स्विफ्टकार ताब्यात घेतली.

तसेच ताब्यातील आरोपींकडे कत्तलीसाठी आणलेली जनावरे कोठे बांधून ठेवली? याबाबत विचारपूस करता त्यांनी बंगला मस्जिद जवळील तारेचे कंपाउंडमध्ये बांधून ठेवली आहे असे सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन पाहणी करता 60 हजार रुपये किंमतीच्या तीन मोठ्या गायी, 85 हजार रुपये किंमतीची 18 वासरे अशी एकूण 1 लाख 45 हजार रुपये किंमतीची 21 जिवंत जनावरे मिळून आल्याने ताब्यात घेतली.

सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्जात 67 हजार 40 रुपये किंमतीचे 415 किलो गोमांस तुकडे, 1 लाख 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 21 लहान मोठी जिवंत जनावरे व तीन लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार अस एकूण 5 लाख 92 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस कॉन्स्टेबल मयुर दीपक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नेवसा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 702/2023 म.प.सु.अ.चे कलम 5 (9), 9 सह प्रा.नि.वा.क. 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या