Friday, April 26, 2024
Homeनगरप्रेमविवाहामुळे जीवे ठार मारण्याच्या कट

प्रेमविवाहामुळे जीवे ठार मारण्याच्या कट

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील युवकाने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मुलीच्या माहेरच्या मंडळींनी जीवे ठार मारण्याच्या

- Advertisement -

उद्देशाने घातक शस्त्रांसह येऊन तसा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील आरोपींना 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या आरोपींना काल शनिवारी न्यायालयात हजर केले असता आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली.

प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात 307 कलमासह प्रदिप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भिमराज कनोजे, शाहीद सय्यद, नारायण हंरीभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे, सतिष भोसले या 7 जणांवर विविध गुन्हे दाखल आहेत.

सदर गुन्ह्यात आरोपी गुन्हा करून पळून जात असताना त्यांना पोलीस पथकाने हत्यारबंद असताना पकडले होते सदर आरोपिंना न्यायालयाने आज पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली होती.कोठडीची मुदत संपल्याने नेवासा पोलिसांनी आरोपींना काल पुन्हा कोर्टात हजर केले असता आरोपींना 15 मार्च पर्यंत वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या