लग्नाच्या तगाद्याने प्रियसीचा खून

0
ना. रोड| दि. ३१ प्रतिनिधी – एकलहरा परिसरातील गवळीवाडा भागात ३० मे रोजी एका युवतीचा मृत देह आढळला होता.तर तो ओळखू येवू नये म्हणून त्या मृतदेहाला जाळून टाकले होते. मात्र पोलिसांनी प्रयत्न करत काही तासात या खुनाचा उलगडा केला असून लग्नाच्या तगाद्यानेच प्रियकराने प्रियेसीचा खून केल्याचे तपासातून समोर आले आहे. प्रियकरास नाशिकरोड पोलीसांनी अटक केली असून त्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र पाटील (२१, मयुरेश्वर डुप्लेक्स, शिंदे मळा, अशोकनगर, सातपूर ) असे खून करणार्‍या संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झाला त्या दिवशी हर्षदाने पाटील यास आपण लग्न कधी करायचे अशी विचारणा केली होती.यावर त्यांच्यात वाद झाला होता. पाटील हर्षदाला आपल्या घरी घेवून गेला आणि धारदार हत्याराने तिच्यावर वार करत तिचा खून केला.

यामध्ये तिचा मृत देह कोठे टाकायचा म्हणून त्याने हर्षदाचे मृत शरिर एका मोठ्या बॅग मध्ये टाकले आणि मोपेडवर तिला घेवून तो एकलहरे कडे गेला होता. निर्जन स्थळ पाहणून त्याने तिचा मृतदेह बॅग बाहेर काढत सोबत आणलेल्या रॉकेल तिच्यावर टाकून ते पेटवून दिले. त्या ठिकाणाहून पोबारा केला होता. तर हे सर्व करूनही नामा निराळा होत पाटील हा हर्षदच्या घरी जाऊन ती सापडली का ? काही माहिती कळली का ? अशी विचारणा करत पोलीसांची व तीच्या कुटुंबियांची दिशाभूल करत राहिला.
पोलिसांनी सर्व पुरावे आणि माहिती गोळा केली असून संशयीत रोहित पाटीलला अटक केली आहे. लग्नाचे स्वप्न बघत असलेल्या हर्षदाला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

फोन कॉलने झाला उलगडा
घटना उघडकीस आली त्याच दिवशी तक्रारीवरून पोलीसांनी मुलीची ओळख पटवली होती. ती म्हसरूळ येथील रहिवासी असून हर्षदा आहिरे असे या तरुणीचे नाव आहे. तीच्या आई बाबांनी ती हरवल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. त्यामुळे पोलिसांनी चक्रे फिरवत बेपत्ता तरुणी हर्षदा असल्याचे निष्पन केले होते.

मात्र तिचा खून कोण करेल असा प्रश्न पोलिसांना पडला होता. हर्षदच्या फोन आणि इतर पुरावे तपासल्यावर पोलिसांनी तिचा प्रियकर रोहित रवींद्र पाटील याच्याकडे चौकशी केली होती. आधी उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या पाटीलला चौदावे रत्न दाखवताच त्याने हा सर्व प्रकार कबूल केला.

LEAVE A REPLY

*