Friday, April 26, 2024
Homeनगरपाळीव कुत्र्यावर कोयत्याने हल्ला; गुन्हा दाखल

पाळीव कुत्र्यावर कोयत्याने हल्ला; गुन्हा दाखल

लोणी (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात पाळीव कुत्र्यावर पुतण्याने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चुलत्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

- Advertisement -

बाबासाहेब लक्ष्मण ढोबळे रा.मापारवाडी रोड, लोणी खुर्द यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की,मी शेतात घर बांधून रहात असून माझ्याकडे पाळीव कुत्रा आहे. आम्ही दोघे पती-पत्नी टाकळीभान येथे नातेवाईकांच्या वर्षश्राद्धासाठी त्याला साखळीने बांधून गेलो होतो.

परंतु माझा पुतण्या दीपक दत्तात्रय ढोबळे याचा मला फोन आला. त्याने तुझ्या कुत्र्याचे काम केले असून मी कोयता घासून ठेवला आहे तू घरी ये,तुझेही काम करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या कुत्र्याच्या तोंडावर,पाठीवर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून मी खाजगी डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले आहेत.

पोलिसांनी दीपक ढोबळे विरुद्ध भादवी कलम ४२८,४२९,५०७ व पाळीव प्राणी छळ प्रतिबंध कायद्याच्या कलम ११ नुसार गुन्हा दाखल केला. लोणी पोलीस ठाण्यात कुत्र्यावर हल्ला झाल्यानंतर तक्रार झाल्याची ही पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या