Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपूरच्या युवकाची लोणीत गोळ्या झाडून हत्या

श्रीरामपूरच्या युवकाची लोणीत गोळ्या झाडून हत्या

श्रीरामपूर, लोणीचे हल्लेखोर पसार

लोणी (वार्ताहर) – श्रीरामपूर येथील एका तरुणास लोणी येथील एका हॉटेलमध्ये आणून त्याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत त्या युवकाचा मृत्यू झाला आहे. यात श्रीरामपूर येथील तीन तर लोणी येथील चार आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर येथील सुभेदार वस्ती, बीफ मार्केटजवळ राहणारा फरदिन अबू कुरेशी (वय 18) याला रविवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान बळजबरीने लोणीत आणून हॉटेल साई छत्रपती मध्ये त्याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. रविवारी रात्री 9 वाजता झालेल्या या घटनेत त्याचा मृत्यू झाला. श्रीरामपूर येथील तीन तर लोणीतील चार आरोपीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून घटनेमुळे लोणी परिसर मात्र हादरून गेला आहे.

मयत फरदिनची आई आशा अबू कुरेशी (रा.वॉर्ड नं.2 बीफ मार्केटजवळ, श्रीरामपूर) यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार संतोष सुरेश कांबळे, सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख व शाहरुख शहा गाठण (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी बळजबरी करून व धमकी देऊन फरदिन याला नाशिकला जायचे म्हणून सोबत नेले व नंतर ते लोणीत आले. लोणीतील दाढ रस्त्यावरील हॉटेल साईछत्रपतीमध्ये त्यांना उमेश नागरे, अक्षय बनसोड, अरुण चौधरी व शुभम कदम(सर्व रा.लोणी) हे भेटले.आरोपींनी वाद निर्माण करून थेट फरदिन याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

दरम्यान, रविवारी रात्री 9 वाजता घडलेल्या या घटनेत फरदिन गंभीर जखमी झाला. हॉटेलमध्ये ग्राहकांची यावेळी गर्दी होती. बंदुकीच्या आवाजाने सर्वजण भयभीत झाले. आरोपींनी जखमी अवस्थेत फरदिनला प्रवरा रुग्णालयात नेले व तेथून ते पसार झाले. फरदिनचा मात्र यावेळी मृत्यू झाला. या घटनेने पोलिसही हादरले. लोणी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.वरिष्ठ अधिकार्‍याना माहिती देण्यात आली. शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे पहाटेच घटनास्थळी आले.

अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी लोणीत आले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्व आरोपी दिसून आले. त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाली असून लवकरच आरोप जेरबंद होतील, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला.घटनेमागील कारण मात्र समजू शकले नाही. आरोपीमधील अनेकजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने पोलीस याचा अनेक बाजूने तपास करीत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 359/19 प्रमाणे संतोष सुरेश कांबळे, सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख व शाहरुख शहा गाठण, अक्षय बनसोड, अरुण चौधरी व शुभम कदम यांच्याविरुध्द भादंवि कलम 302,143,147,148,149,506,34 व आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोणीच्या शांततेला गालबोट!
लोणी हे गाव सहकार व शिक्षण या क्षेत्रात देशाच्या पातळीवर नावलौकिक मिळवलेले आहे. गावात गुन्हेगारीला कधीच थारा मिळालेला नाही. हजारो विद्यार्थी इथं शिक्षण घेत असल्याने सामाजिक सलोखा आणि शांतता इथली जमेची बाजू आहे. देश-विदेशातील नागरिक आपल्या मुला-मुलींना विश्वासाने इथे प्रवेश घेतात. लोणीचे ग्रामस्थ दररोजच्या घडामोडीवर लक्ष ठेऊन असतात. मात्र रविवारच्या घटनेने लोणीच्या शांततेला गालबोट लागले आहे.अवैध व्यवसाय आणि पोलिसांची कार्यक्षमता यामागे असल्याचे बोलले जाते. या घटनेतून वेळीच धडा घेतला नाही तर भविष्यातील धोक्याना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल हे मात्र नक्की.लोणीच्या शांततेला गालबोट लागले आहे.अवैध व्यवसाय आणि पोलिसांची कार्यक्षमता यामागे असल्याचे बोलले जाते. या घटनेतून वेळीच धडा घेतला नाही तर भविष्यातील धोक्याना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल हे मात्र नक्की.

- Advertisment -

ताज्या बातम्या