Friday, April 26, 2024
Homeनगरमहिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून केला व्हायरल

महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून केला व्हायरल

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

पुर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा

- Advertisement -

अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. याप्रकरणी आरोपी लतेश शाम नन्नवरे (रा. राहाता) याच्या विरुद्ध कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला 6 एप्रिलपर्यंत (चार दिवसांची) पोलिस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या घराशेजारी कोपरगाव येथे राहात असलेल्या आरोपीने फिर्यादी महिलेशी ओळख केली. एकमेकाच्या जवळ आले, मात्र त्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने या महिलेने एक वर्षापूर्वी आरोपीविरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती.

दरम्यान आरोपीने महिलेच्या फोटोची एक अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली. ही व्हिडिओ क्लिप दाखवून महिलेस विनयभंगाची तक्रार मागे घे अन्यथा ही क्लिप व्हायरल करेल अशी धमकी आरोपी देत होता पण महिलेने जुमानले नाही. म्हणून आरोपीने दि. 2 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता त्याचे मोबाईलवर फिर्यादीचे अश्लील फोटोचा व्हीडीओ तयार करुन लिंक वर व्हायरल करुन फिर्यादीची बदनामी करुन फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

याबाबत महिलेने कोपरगाव शहर पोलिसात धाव घेत आरोपी विरुद्ध गु.र.नं.कलम 103/2021 भा.द.वि.कलम 354 (क),507 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पुढील तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या