कोपरगाव उपनगराध्यक्षासह दोघांवर गुन्हा

0

वीज वितरण पथकाला मारहाण

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – औद्योगिक वसाहतीतील समर्थ बर्फ कारखाना येथील विद्युत मीटर तपासणी करिता गेलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्यासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याची घटना शनिवार घडली असून कोपरगाव शहर पोलिसांत दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सुनील प्रकाश कळमकर (वय 37) रा. शिवालय कॉम्प्लेक्स सूचक नाक्याजवळ, कल्याण पूर्व (जिल्हा ठाणे) हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता असून त्यांचे कर्मचारी विपुल भिंगारदिवे, किरण वणवे, विजय पाटील, विजय हुले यांना घेऊन कोपरगावातील औद्योगिक वसाहतीतील समर्थ बर्फ कारखान्यात असलेल्या विद्युत मीटर तपासणीसाठी गेले होते.
मीटरच्या माध्यमातून विजेची चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तेथील कर्मचार्‍याला कारखान्याच्या मालकास बोलावण्यास सांगितले. काही वेळाने तेथे कारखान्याचे मालक विजय वाजे व रवींद्र वाजे आले. त्यांनी अधिकार्‍यांना मीटर तपासणी करण्यास विरोध केला. सुनील कळमकर यांना शिवीगाळ करून त्यांच्या जवळ असलेला लॅपटॉप फोडला. बचावासाठी आलेले विपुल भिंगारदिवे, किरण वणवे, विजय पाटील, विजय हुले यांना मारहाण केली. सुनील कळमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.क्र व कलम 130/2019 भादवी कलम 353,332,427,504,506 34 प्रमाणे अजय उर्फ रवींद्र गोविन्दराव वाजे व उपनगराध्यक्ष विजय गोविंदराव वाजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.ए.बोरसे करत आहेत.

LEAVE A REPLY

*