अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

jalgaon-digital
1 Min Read

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी निलेश माधव मेहेरखांब हे आपल्या स्कुटी प्लेझर ( क्र.एम.एच .17 सी.जी .0188) वरून जात असताना

सुरेगाव कोळपेवाडी रोडवर पी.जे.स्कूल चौकाजवळ महिंद्रा जितो गाडीत बसलेले आरोपी प्रवीण हौशीराम गायकवाड व सचिन हरिभाऊ मेहेरखांब याने महिंद्रा जितो गाडी चालु करून निलेश मेहरखांब यांच्या अंगावर घालून तसेच गाडीतील हत्यारांनी त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले.

फिर्यादी हे कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात नोकरी करत असून ते दि .26 जानेवारी रोजी दुचाकीवरून घराकडे जात असताना पी.जे. स्कूल चौकात महिंद्रा जितो गाडीत बसलेला आरोपी प्रवीण गायकवाड याने त्यांना हाक मारून थांबण्यास भाग पाडले. आरोपी सचिन मेहेरखांब याने गाडी सुरु करून ती फिर्यादी यांच्या अंगावर घातली. गाडीत ठेवलेले हत्यारे लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, दगड आदींच्या साहाय्याने त्यांच्या पायाच्या नळ्यावर, डोक्यावर, तोंडावर, छातीवर, पोटावर, मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेत निलेश मेहेरखांब गंभीर जखमी झाले आहे. या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *