जीवे मारण्याचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा दाखल

जीवे मारण्याचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा दाखल

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

शहरातील समृध्दी कॉम्प्लेक्स येथे दुकानाच्या जाहीरातीचे बॅनर लावल्याच्या कारणातून 6 जणांच्या टोळक्याने दोघांना शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

कैलास विलास माने, तुषार हनुमंत पवार, बबलु जाधव व राहूल माने (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सुरज निमोणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार निमोणकर यांचे युनिव्हर्सल स्पोर्टचे दुकान आहे. या दुकानांसमोरील कॉलमवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास निमोणकर व त्याचा मित्र विकास कचरू साळुंके हे स्पोर्टच्या जाहिरात चिटकावीत होते.

त्यावेळेस कैलास माने तेथे आला व त्याने बॅनर चिटकावल्यारून निमोणकर व साळुकें यांना शिवीगाळ केली. तसेच त्याचे सहकारी तुषार हनुमंत पवार, बबलु जाधव व राहूल माने व इतर दोन यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने निमोणकर व साळुंके यांना तीन वेळा उचलून जमीनीवरील ब्लॉकवर आदळलेव इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास गोळ्या घालून ठार मारू अशा धमक्या दिल्या. निमोणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी माने व इतरांवर गुन्हो दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com