Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

Share

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील चिखली घाटामध्ये स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुटणारी टोळी बेलवंडी पोलिसांकडून 17 सप्टेंबर रोजी गजाआड करण्यात आली. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील घाटात दिनांक 17 रोजी सायंकाळी स्वस्तात सोने देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून हर्षल हावर्‍या काळे राहणार देऊळगाव सिद्धी तालुका पारनेर उर्फ जैनुद्दीन शेख राहणार हिवरे तालुका पारनेर मंगेश भिकान बोरसे रा. साकोरा ता. नांदगाव, जि. नाशिक, तसेच मंगेश भाऊसाहेब निपटे रा. वडजी ता. वैजापूर, जि. औरंगाबाद, हे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चिखली घाट परिसरात नजर ठेवून विसापूर फाट्या नजीक पांढरी बोलेरो व दोन मोटरसायकली संशयितरीत्या थांबून असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करून त्यांची अंगझडती घेली असता त्यांच्याकडे सत्तूर, मिरचीपूड तसेच बोलेरो वाहनात लोखंडी रॉड व काठ्या आढळून आल्या. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी 399, 403 प्रमाणे गुन्हा दाखल करून या गुन्ह्यांमध्ये बोलेरो जीप क्रमांक एम एकच-14 डी ए 8083 व इतर दरोडा टाकण्याचे साहित्य असे एकूण पाच लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात येऊन या गुन्ह्यातील अटक आरोपींच्या पळून गेलेल्या साथीदारांची नावे शंभू कुंजा चव्हाण, श्रीधर कुंजा चव्हाण, सबीर कुंजा चव्हाण, हरब्या आश्या काळे, लायसन तसळू भोसले, केशव किरण भोसले हे असल्याचे आढळून आले. पोलीस त्यांचा कसून शोध घेत असून या कारवाईत पोलीस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक अरविंद माने, पो. कों. मधुकर सुरावसे, संभाजी शिंदे, आबासाहेब झावरे, हसन शेख, ज्ञानेश्वर पठारे, अंकुश ढवळे आदींचा समावेश होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!