Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जुन्या वादातून बालिकाश्रम रोडवर राडा

Share
सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या, Latest News Women Suicide Shrirampur

कोयता, तलवारीचा वापर; मारहाणीत पाच जण जखमी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील बालिकाश्रम रोडवरील पोलीस कॉलनीजवळ जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटांमध्ये हाणामार्‍या होऊन दगडफेक झाली. यात दोन्ही गटांतील सातजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 12) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.

नंदू विठ्ठल जाधव, आकाश पांडुरंग जाधव, रेणूका प्रशांत चोपडे, भारत बाबूराव जाधव, तुकाराम टिलु गायकवाड अशी जखमींची नावे आहेत. सुमेध ऊर्फ टिंग्या साळवे, अक्षय राजेंद्र जाधव, सनी राजेंद्र जाधव, आदिनाथ वनाजी जाधव, वनाजी मारुती जाधव, चित्रा आदिनाथ जाधव, पल्लवी अक्षय जाधव, सागर वादवणे, ध्रुव विजय बोरुडे, कशिश धुव्र बोरुडे, प्रणव दाणे, ऋषिकेश दरंदले, अक्षय गाडे, स्वप्नील सुरेश जाधव, आकाश पांडुरंग जाधव, भारत बाबुराव जाधव, योगेश विठ्ठल जाधव, विठ्ठल रंगनाथ जाधव व भारत जाधवची आई (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. जाधव मळा, नगर) अशी दोन्ही गटांतील आरोपींची नावे आहेत.

जुन्या भांडणाच्या वादातून दोन कुटुंब समोरासमोर येऊन ही भांडणे झाली. त्यातून कोयता, तलावर, लाकडी दांडक्याने एकमेकांना मारहाण करून दगडफेक केली. त्यात किराणा दुकानाची तोडफोड करण्यात आली. सुमारे अर्धातास हा प्रकार सुरू होता. तोफखाना पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आरोपींनी कोयता, तलवारीने विठ्ठल जाधव, आकाश जाधव, रेणुका चिपाडे, भारत बाबूराव जाधव, तुकाराम जाधव यांना मारहाण केली. मोटारसायकल, किराणा दुकान, खानावळीतील फर्निचरची तोडफोड केली, असे योगेश विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आदिनाथ वनाजी जाधव यांनी स्वतंत्र फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री माझी पत्नी भाजीपाला घेऊन घरी जात होती. त्यावेळी आकाश जाधव, भारत जाधव, योगेश जाधव व इतर आमच्या घरासमोर असलेल्या वाहनांची तोडफोड करत असल्याचे दिसले. तुम्ही असे का करता, वाहने तोडू नका असे म्हटल्याच्या कारणावरून फिर्यादीच्या पत्नीस लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. डी. गाजरे करत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!