Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

देडगाव खून प्रकरणी एकास 14 पर्यंत पोलीस कोठडी

Share
तलवार घेऊन नाचणार्‍या युवकांविरुध्द गुन्हा दाखल, Latest News Crime News Complient Ragister Pathardi

वकिलासह दोघांची हत्या; चौघांच्या पोलीस कोठडीतही वाढ

नेवासा (का. प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील देडगाव येथे शेतमजुराच्या हत्या प्रकरणी अटकेतील आरोपी संभाजी शिवाजी थोरात याला काल न्यायालयात हजर केले असता त्याला 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. जेऊर हैबती येथील वकील व त्याच्या सहकार्‍याच्या हत्या प्रकरणातील चौघा आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्यांनाही काल न्यायालयात हजर केले असता त्यांनाही 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, सोमवारी रात्री जेऊरहैबती येथील शेतमजूर शेषराव पांडुरंग मोरे (वय 58) यांची हत्या झाली होती. या प्रकरणी शेषराव मोरे यांचा मुलगा गणेश शेषराव मोरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी रात्री नेवासा पोलीस ठाण्यात संभाजी शिवाजी थोरात व लक्ष्मण एकनाथ एडके या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संभाजी शिवाजी थोरात याला अटक करण्यात आली होती. त्याला काल बुधवारी नेवासा न्यायालयात हजर केले असता त्याला 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरा आरोपी लक्ष्मण एकनाथ एडके हा फरार आहे.

2 ऑक्टोबर रोजी दुपारी जेऊर हैबती येथे वकील संभाजी राजाराम ताके व त्यांचा सहकारी संतोष सुंदरराव घुणे या दोघांच्या झालेल्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या चौघा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना काल नेवासा न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या सर्वांच्या पोलीस कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. या घटनेतील आरोपी शरद शिवाजी ताके याला 2 ऑक्टोबरलाच अटक झाली होती त्याला 3 तारखेला न्यायालयात हजर केले होते.

तर 3 तारखेला त्याची आई मंदा शिवाजी ताके व पत्नी सोनल शरद ताके यांना अटक करुन 4 तारखेला न्यायालयात हजर केले होते. त्याचे वडील शिवाजी राजाराम ताके यांनाही अटक करुन न्यायालयात हजर केले होते. काल या चौघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चौघांनाही 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली. या प्रकरणांमध्ये पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत दाते हे करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!