Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

तहसीलदारांवर हल्ला करणारा वाळूतस्कर नगरमध्ये जेरबंद

Share

कारवाईच्या ठिकाणावरून उलटसुलट चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेले पारनेरचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या अंगावर डंपर घालणार्‍या वाळूतस्काराला पारनेर पोलिसांनी लालटाकी परिसरात जेरबंद केल्याची चर्चा आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून कारवाईच्या ठिकाणाहून पोलीस दलात उलटसुलट चर्चा आहे. बापू बन्सी सोनवणे असे या वाळूतस्कराचे नाव आहे.

भाळवणी परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पारनेरचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना मिळाली होती. त्यानुसार ते कारवाई करण्यासाठी भाळवणी परिसरात पोहचले. यावेळी वाळूतस्कर सोनवणे याने तहसीलदार चव्हाणके यांच्याशी वाद घालत त्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.23) सायंकाळी घडली होती. त्यानंतर वाळूतस्कर पिन्या (रा. भिल्ल हट्टी वस्ती, जखणगाव, ता. नगर) आणि सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) यांच्या विरोधात तहसीलदार चव्हाणके यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, आरोपी फरार होते. पारनेर पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर असताना आरोपी सोनवणे हा नगरमध्ये आल्याची खबर मिळाली. त्यांनी या आरोपीला नगरमध्ये अटक केली. मात्र, ही अटक शहरातील लालटाकी परिसर की अन्य ठिकाणी यावर रविवारी दिवसभर पोलीस वर्तुळात चर्चा होती.

नगर-कल्याण हायवेवरील नेप्ती नाका या ठिकाणी इरटीका कारमधून आरोपीला ताब्यात घेतले आहे. कागदावर जे आहे ते मी तुम्हाला सांगितले असून याबाबत अधिक बोलू शकत नाही.
– बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक, पारनेर.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!