Type to search

Featured सार्वमत

नगर: सिनेकाठी अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Share

भिंगारमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – सीना नदीकाठी बकर्‍या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना काल बुधवारी घडली. या प्रकरणी भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण उर्फ बंड्या अशोक निमसे (रा. पदमपुरवाडी, ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 376 (2) (ख) पोक्सो कलम 4 व 8 तसेच अनुसुचित जाती जमाती आत्याचार प्रतिबंधक सुधारित कायदा 2015 चे कलम 3 (1) (थ) (ख), 3(2) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पिडित मुलगी ही वाकोडी शिवारातील सीना नदीकडेला बकर्‍या चारायला घेऊन गेली होती. बंड्या निमसे तेथे आला. त्याने पिडितेला उचलून शेवग्याच्या झाडांमध्ये नेले. त्याने पिडितेचे कपडे काढले तेव्हा तिने आरडाओरडा केला. परंतु आसपास कोणी नव्हते. बंड्याने तिच्याशी जबरदस्तीने अत्याचर करत तेथून धूम ठोकली. पिडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!