Type to search

Featured सार्वमत

नगर: चोरीचा मोबाईल घेणारा गुताड्यात

Share

वांबोरी घाटात व्यापार्‍याला लुटणारे निष्पन्न

अहमदनगर (प्रतिनिधी) – वांबोरी घाटात व्यापार्‍याला लुटणार्‍या टोळीचा छडा एलसीबी पोलिसांनाी लावला आहे. टोळीतील तिघे मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत. व्यापार्‍याकडून लुटलेला मोबाईल विकत घेणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

प्रसाद बाबासाहेब चेंडवल (रा. गुंजाळे, ता. नगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याने चोरीचा मोबाईल विकत घेतला होता. विकास बाळू हनवत, कृष्णा भानुदास शिंदे (रा.कात्रड, राहुरी), रवी बर्डे (रा. मोरेचिंचोरे, नेवासा) या तिघांनी वांबोरी घाटात पंकज नबरीया या व्यापार्‍याला शुक्रवारी रात्री लुटले होते. या तिघांनी नबरिया यांना मारहाण करत 6 हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल लंपास केला होता.

चोरीचा मोबाईल चेंडवल यास विकल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांना खबर्‍याकडून समजली. त्यांनी पथकाला आदेश देत त्यास ताब्यात घेतले. त्याने शिंदे, बर्डे, हनवत यांची नावे सांगितली. चेंडवल यास मोबाईलसह एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नाबरीया यांना लुटणारे तिघे मात्र पसार झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!