Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त

Share

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – विना परवाना बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन पोलीसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नगर तालुका पोलीसांनी नेप्ती गावच्या शिवरात रविवारी दुपारी केली. दरम्यान गावठी दारू तयार करणारा त्या ठिकाणाहून पसार झाला.

याबाबत माहिती अशी,नगर तालुका पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,नेप्ती गावच्या शिवारात रानमळा येथे गावठी दारू तयार केले जात आहे. त्यांनी आपल्या पथकासह छापा टाकला असता त्या ठिकाणी गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी आणलेले कच्चे रसायन व भट्टी चालक दिसले.पोलीसांना पाहताच भट्टी चालक पळून गेला. परंतु,त्या ठिकाणी अंबड वास येत असलेले दोन लाख,2500 रुपये किंमतीचे पाच प्लास्टिकचे बँरल रसायन मिळून आले.सदरची कारवाई नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत,पोहेकॉ संभाजी डेरे,पोना अबनावे,पालवे,सोनवणे, राहुल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.पोना राहुल शिंदे यांच्या फिर्यादीवरून सचिन बाळू जपकर (रा.रानमळा, नेप्ती ता.नगर) यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!