Type to search

अकोलेत 800 किलो गोवंश मांस जप्त

Featured सार्वमत

अकोलेत 800 किलो गोवंश मांस जप्त

Share

अकोले (प्रतिनिधी)- गोवंश जनावरांचे कत्तल केलेले मांस घेऊन जाणारी इनोव्हा कार अकोले पोलिसांनी कोल्हार-घोटी रोडवर हॉटेल संजीवनी समोर पकडली. यामध्ये 800 किलो मांस व कार असा एकूण सहा लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी चार वाजता करण्यात आली.

गोवंश जनावरांचे कत्तल केलेले मांस एका कारमधून जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हार-घोटी राज्यमार्गावर हॉटेल संजीवनी समोर सदर इनोव्हा कार क्रमांक एम. एच. 06, ए. सी. 1001 ही पकडली. त्यामध्ये 800 किलो गोवंश जनावरांचे मांस आढळून आले. अफरोज सलीम शेख, युसूफ मोहंमद हुसेन (दोघेही रा. (कसाईवाडा, कुरेशी नगर, कुर्ला, पूर्व मुंबई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 800 किलो गोवंश मांस एक लाख 20 हजार रुपयांचे व इनोव्हा कार 5 लाख रुपयांची असा एकूण सहा लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी वरील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सदाफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 200/19 भारतीय दंड संहिता 269, 429, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सन 2015 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 चे कलम 5(क), 9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निपसे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!