Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पोलिसांच्या सावधपणामुळे अजहर निसटला

Share

‘तुम्हाला घेरले आहे, पळून जा’ साथीदारांना संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – उद्योजक करिमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणाच्या कटातील मुख्य सूत्रधार अजहर मंजूर शेख (रा. फकीर गल्ली, नगर) हाच असल्याची माहिती सोमवारी (दि. 18) पहाटे अपहरण झाल्यानंतर काही क्षणातच पोलिसांना मिळाली होती. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या अजहरच्या विरोधात हुंडेकरी यांनी पोलिसांना एका संवेदनशील प्रकरणात मदत केली होती. याचा अजहरच्या डोक्यात राग आहे. यातून आणि पैशाची गरज म्हणून हा अपहरणाचा कट रचला.

स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अजहर याच्या मागावर होते. अजहरने गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील परतूर येथे वास्तव्य वाढविले होते. या परिसरात बहुतांशी मुस्लिम समाज राहतो. त्याचा फायदा घेत त्याने तिथे बस्तान बसविले. हुंडेकरी यांना जालना येथे सोडून दिल्यानंतर अजहर परतूरला गेला. त्यावेळी त्याच्याबरोबर गुन्ह्यात मदत करणारे साथीदार देखील होते. गुन्ह्यात वापरलेली मोटरगाडी त्याने राहत असलेल्या ठिकाणापासून लांब लावली होती.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ती हेरली. परंतु मोटरगाडी जिथे उभी होती, तिथे अजहर आणि त्याचे साथीदार राहत होते की, घरबदलून याबाबत पथकातील पोलीस साशंक होते. काही वेळ माग काढत पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरले. पोलिसांच्या हालचालीमुळे परिसरातील लोकांना संशय आला. याचा फटका सापळा अयशस्वी होण्यास बसेल म्हणून पोलिसांनी सापळा ढिला सोडला. तेवढ्यात अजहर मोटरगाडी जिथे थांबवली होती, ते ठिकाण सोडून काही अंतरावर असलेल्या घरातून बाहेर आला. घराबाहेर येऊन अजहर पुन्हा घरात गेला. या दरम्यान, अजहरनेे त्याच्याकडे असलेल्या दुसर्‍या गाडीचे टायर बदलले. याचवेळी पोलीस सापळा आवळणार होते, परंतु परिसरातील लोकांची रहदारी पाहून सबुरी घेतली.

बराच वेळ अजहर एकटाच घरात ये-जा करत होता. पोलीस संशय येणार नाही, या पद्धतीने अजहरच्या घरावर लक्ष ठेवून होते. मध्यरात्रीनंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. अजहर असलेल्या घराभोवती सापळा आवळला. घरात छापा घातल्यावर पोलिसांना तेथे वैभव विष्णू सातोनकर व निहाल मुशरफ शेख ऊर्फ बाबा हे दोघे सापडले. हे गुन्ह्यातीलच आरोपी होते. अजहर मंजुर शेख आणि गुन्ह्यातील चौथा आरोपी फतेह सिद्धीक अहमद अन्सारी (रा. मंगलशहा मोहल्ला, परतूर, जालना) हे दोघे अजहर याच्या दुसर्‍या गाडीतून चहा पिण्यासाठी गेले होते. पोलिसांनी घरावर छापा घातला त्याचवेळी पोलिसांच्या ताब्यात असलेले वैभव आणि निहाल या दोघांना अजहरचा मोबाईलवर फोन आला. ‘पोलिसांनी घेरले आहे, तेथून पळून जा. पोलीस जालन्याचे आहेत की नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे हे माहित नाही, पळून जा’ असा त्याचा संदेश होता. पोलिसांनीच फोन उचलला असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने फोन बंद केला आणि बरोबर असलेल्या साथीदारासह त्याने पळ काढला.

अजहरच्या मागावर पथक कार्यरत
अजहर मंजूर शेख खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथील सापळ्याला चकवा दिलेल्या अजहरचा शोध या गुन्ह्याच्या दृष्टीने पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अजून त्याच्या मागावर आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!