Saturday, April 27, 2024
Homeनगरपित्याचा मुलीवर अत्याचार

पित्याचा मुलीवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मजुरीचे काम करणार्‍या पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील एका उपनगरात घडली.

- Advertisement -

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी पित्याविरोधात अत्याचारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. परप्रांतातून नगरमध्ये कामासाठी आलेल्या या व्यक्तीने राहत्या घरी स्वतःच्याच मुलीवर अत्याचार केला.

पतीच्या या कृत्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या