लाचप्रकरणी सायबर सेलच्या पोलिसाविरोधात गुन्हा

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – तक्रारीबद्दल भविष्यात पुढे अडचणी येऊ नयेत म्हणून, प्रकरणात हस्तक्षेप केल्याबद्दल पाच हजार रुपयांची मागणी करणार्‍या पोलिसांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाने बुधवारी कारवाई केली. सायबर सेलमधील आकाश अनिल भैरट या पोलीस कर्मचार्‍याविरोधात ही कारवाई झाली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भैरट याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदाराची मुलीच्या मोबाईलसंदर्भात तक्रार होती. ती मिटविण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल भैरट याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या लाचेच्या मागणीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाकडे नोंदविण्यात आली होती. पथकाने या तक्रारीची 24 ऑगस्टला चौकशी केली होती. यानुसार भैरटविरुद्ध पथकाने कारवाई करत आज अटक केली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भैरटविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*