Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: मुलीशी चाळे करणारा बाप अटकेत

Share
श्रीगोंदा: अजनूजमध्ये दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपी अद्याप फरार, Latest News Shrigonda Ajnuj Try Kill

काटवन खंडोबा भागातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – पंधरा वर्षे वयाच्या मुलीशी चाळे करणार्‍या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पिडित मुलीनेच पोलिसात धाव घेत बापाविरोधात तक्रार दाखल केली.

पिडित मुलगी व तिचा बाप हे दोघेच घरी असताना तो तिच्याशी अश्लिल चाळे करत असत. नको तेथे हात लावून तो लज्जास्पद वर्तन करत असत. अंघोळ करत असताना खिडकीत मोबाईल ठेवून त्याचे शुटींग केले. त्याचा जाच वाढत गेल्याने पिडित मुलीने पोलिसात धाव घेत बापाविरोधातच तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्या विकृत पित्याला अटक केली आहे. विनयभंग आणि पोक्सो कायद्यान्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!