Friday, April 26, 2024
Homeनगरबुलट हट्टासाठी मुलाने वडिलाच्या अंगावर ओतले उकळते तेल

बुलट हट्टासाठी मुलाने वडिलाच्या अंगावर ओतले उकळते तेल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बुलेट का घेत नाही म्हणून मुलाने पित्याच्या अंगावर कढईतील उकळते तेल टाकले. ही धक्कादायक घटना सावेडीत 23 रोजी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी अतुल गुप्ता (वय 40, रा. रूपमातानगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

त्यांच्या फिर्यादीवरून मुलगा अनिरूध्द गुप्ता आणि पत्नी सुवर्णा गुप्ता यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 रोजी रात्री नऊ वाजता अतुल गुप्ता हे जेवण बनवत असताना ते मुलगा अनिरूध्दला म्हणाले की, तु कॉलेजला का जात नाही. असे म्हटल्यावर त्याने भाजी करण्यासाठीचे कढईतील उकळते तेल अंगावर फेकले.

तसेच तुम्ही मला बुलेट घेऊन का देत नाहीत, असे म्हणून त्याने जवळ असलेली लाकडी काठी माझ्या डोक्यात व हातावर मारली. त्यानंतर पत्नी मुलाला म्हणाली की, आणखी त्याला मार. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या