Friday, April 26, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील युवकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात अत्याचारासह बाललैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.

नगर तालुक्यातील जामखेड रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या गावात आरोपी व पीडित अल्पवयीन मुलगी राहावयास आहे. या गावातील एका पुलाजवळ आरोपीने अल्पवयीन मुलीला थांबवले. तुझ्या घरच्यांनी तुला बोलावले आहे, असे म्हणून त्या मुलीला गाडीवर बसवले.

गावाच्या जवळ असलेल्या एका पुलाच्या खाली घेऊन जात अल्पवयीन मुलीला ‘कोणाला काही सांगितल्यास तुला जिवे मारून टाकेल, असे म्हणत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्यासह नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक जारवाल आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या