Thursday, April 25, 2024
Homeनगरनोटीस बजावणीसाठी गेलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा

नोटीस बजावणीसाठी गेलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हद्दपार आदेशाची नोटीस बजावणी करून पोलीस ठाण्याकडे परत येत असताना पोलीस अंमलदारांना अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी मुकुंदनगर भागात घडली. याप्रकरणी सरफराज मोहम्मद इब्माही सय्यद ऊर्फ सरफराज जहागीरदार (रा. मेहराजमस्जिद, मुकुंदनगर) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 186 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अब्दुलकादर परवेज इनामदार (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. शहरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याच्या तयारीत असलेल्या 12 जणांना तीन दिवसांसाठी नगर शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांच्या प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी ही कारवाई केली आहे.

या हद्दपारीमध्ये सरफराज मोहम्मद इब्माही सय्यद ऊर्फ सरफराज जहागीरदार याचाही समावेश आहे. यासंदर्भात नोटीस देण्यासाठी फिर्यादी अंमलदार व त्यांचे सहकारी शनिवारी सायंकाळी मुकुंदनगर येथे गेले होते. त्यांनी हद्दपार आदेश नोटीस बजावणी करून कोतवाली पोलीस ठाण्याकडे येत असताना सरफराज हा त्यांच्या दुचाकीला आडवा झाला. त्याने दुचाकी जाण्यास प्रतिबंध करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या