डॉक्टर नवरा-बायको पोलिसांच्या दारात

0

नगर टाइम्स,

मुलं हिसकावली: पती, सासर्‍याविरोधात गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) – दोघेही पेशाने डॉक्टर. पण घरात भांड्याला भांड लागलं. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेला हा वाद इतका विकोपाला गेला की अखेर ‘तिला’ पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. मुलांना हिसकावून घेतल्याचा राग अनावर झाल्याने ‘ती’ पोलिसात पोहोचली. आता या दोन सुशिक्षित फॅमिलीचा वाद मिटविण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांनीच मध्यस्थाची भूमिका निभावण्यास सुरूवात केली आहे.

महिला डॉक्टरपासून तिची दोन मुलंही सासरच्या लोकांना हिसकावून घेतली. त्याच रागातून अन् मुलांच्या मायेपोटी ‘तिने’ आता लढा उभा केला आहे. नगर तालुक्याच्या एका गावातील या डॉक्टरांचा विवाह तीन वर्षांपूर्वी स्त्रीरोग तज्ज्ञाशी झाला. त्यांचंही क्लिनीक. मात्र घरात भांड्याला भांड लागलं. अनेक दिवस घरातच त्याचा आवाज घुमत राहिला. पण एक दिवस तो विकोपाला गेला अन् तिने पोलिसांची पायरी चढली. आता डॉक्टर असलेल्या पतीसह सासरे, सासू, दीर यांच्या विरोधात तिने गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपास सुरू केला. ‘इतके दिवस सहन केले, पण आता वाद विकोपाला गेल्यानं पोलिसांची पायरी चढले’ असं तिचं म्हणणं. पोलिस तपासात चुक असल्याचे निदर्शनास येताच मग ‘त्यांनी’ही रिव्हर्स गिअर टाकला. दोघांचा संसार जुळतो म्हटल्यावर मग पोलिसांनीच मध्यस्थाची भूमिका निभावण्यास सुरूवात केली. त्यांचा संसार आता सहमतीच्या मार्गावर आहे. मात्र पोलिसांत हा वाद पोहचल्याने त्याची चर्चा गावभर सुरू आहे.

माहेरच्यांनाही झाली मारहाण
नगर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. तीन वर्षापूर्वी दोघांचे लग्न झाले. त्यांना दोन मुलं. एके दिवशी ‘ती’ लहान मुलास दूध पाजत होती. पती, सासरे यांनी त्यांच्याकडून मुलास हिसकावून घेत शिवीगाळ करत मारहाण केली. मुलांना व डॉक्टर महिलेस वेगवेगळ्या रुममध्ये कोंडून ठेवले. त्यांच्या माहेरचे लोक समजावून सांगण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. या झटापटीत डॉक्टर महिला जखमी झाल्या. त्यांच्या फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस झाले मध्यस्थ
याच फॅमिलीचा नगरच्या बाजारात व्यवसाय आहे. व्यावसायिक फॅमिलीतील ‘ते’ एकमेव मेडिकल फिल्डकडे वळाले. ज्यांच्या मध्यस्थीने लग्न जमले ते आता हयात नाहीत. चुका तर सगळेच करतात, पण एकमेकांना समजावून घेतलं पाहिजे या समजुतीप्रमाणे पोलीस मध्यस्थाची भूमिका बजवत आहेत.

LEAVE A REPLY

*