Saturday, April 27, 2024
Homeनगरकर्जत घटनेची केंद्रीय गुप्तचर अधिकार्‍यांकडून चौकशी

कर्जत घटनेची केंद्रीय गुप्तचर अधिकार्‍यांकडून चौकशी

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत येथील युवकावर टोळक्याने केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाचे तीन अधिकारी कर्जत शहरामध्ये शनिवारी रात्री दाखल झाले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील अधिक 8 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयितांची संख्या 14 झाली आहे.

- Advertisement -

तसेच या घटनेतील यापूर्वी अटक केलेल्या पाच संशयितांना कर्जत येथील न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. तसेच या घटनेच्या तपासासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी शनिवारी रात्री शहरामध्ये दाखल झाले असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनेदेखील या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर कर्जत पोलीस पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकत्रित तपास करत या गुन्ह्यातील सर्व संशयितांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य संशयित शाहरुख आरिफ पठाण (28), इलाई महेबूब शेख, (20), टिपू सरिम पठाण (18), साहिल शौकत पठाण (23), हर्षद शरीफ पठाण (20) रा. सर्व लोहारगल्ली, कर्जत), आकिब कुदरत सय्यद (24), निहाल इब्राहिम पठाण (20) रा. दोघे (हनुमानगल्ली कर्जत), व एक विधीसंघर्षीत बालक यांना कर्जत पोलीसांनी अटक केली असून एकुण अटक संशयितांची संख्या 14 झाली आहे.

दरम्यान काल अटक करण्यात आलेल्या 6 संशयितांपैकी पाच जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर यादव, स.पो.नि.सतिष गावीत, पो.स. ई. अमरजित मोरे, पो.स. ई. भगवान शिरसाठ, पो.स. ई. अनंत सालगुडे, पो.ना. संतोष धांडे, पो.ना. शाम जाधव, ईश्वर माने, सचिन वारे, देवा पळसे, अमित बरडे, मनोज लातुरकर यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत हे करीत आहेत.

केंद्रीय अधिकारी ठाण मांडून

या घटनेनंतर नेतेमंडळींच्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कर्जत शहरांमध्ये केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे तीन अधिकारी दाखल झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी हे अधिकारी करत असून कर्जत शहरांमध्ये हे तिन्ही अधिकारी तपासासाठी ठाण मांडून बसले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या