Friday, May 3, 2024
Homeनगरदुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकीं चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पकडली. त्यांच्याकडून सहा लाख 85 हजार रूपये किंमतीच्या 17 दुचाकीं हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

शेख अकिल शेख खलील (वय 49), शेख मंजुर अनिस अहमद (वय 31), मुकर्रस मुस्तफा सय्यद (तिघे रा. भवानीनगर, औरंगाबाद), आयुब याकुब सय्यद (रा. विळद ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेख अकिल व त्याचा साथीदार चोरीच्या दुचाकी औरंगाबादरोडने नगरकडे घेवून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, भानुदास खेडकर, राहुल व्दारके, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, महादेव निमसे, संभाजी कोतकर व संजय काळे यांच्या पथकाने नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल सनी पॅलेस येथे सापळा लावुन संशयीत शेख अकिल शेख खलील, शेख मंजुर अनिस अहमद यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातील विना नंबर मोपेड ही नगरच्या स्टेट बॅक येथुन दोघांनी मिळुन चोरी केली बाबत माहिती दिली. या दोन्ही दुचाकी चोरट्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले साथीदार मुकर्रम मुस्तफा सय्यद, आयुव याकुब सय्यद (फिटर) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौघांनी चोरीच्या 17 दुचाकी दिल्या. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत. नगर जिल्हा व औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्ह्यांची माहिती घेतली असता या आरोपींनी दिलेल्या माहिती वरून एकुण नऊ गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे पकडलेल्या आरोपींनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळुन केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या