कृषीउद्योग मंडळाचे विभाग प्रमुख व उपव्यवस्थाकावर गुन्हा

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील मार्केटयार्ड येथील कृषी उद्योग मंडळात कागदपत्रांची अफरातफर व बनावट दस्तावेज तयार करुन 66 लाख 3 हजारांची अफरातफर करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना 2012 ते 2017 या कालावाधीत घडली असून याप्रकरणी केल्याप्रकरणी कृषी उद्योग मंडळाचे विभाग प्रमुख व उपव्यवस्थापक यांच्यासह एका लिपिकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभाग प्रमुख राजेंद्र गयाजी होले (रा. उक्कडगाव), उपव्यवस्थापक महेश मनोहर राजुरकर (रा. प्रेमदान चौक, नगर) व लिपीक रामदास कुलर (रा. उक्कडगाव), (रा. नाशिक) अशी आरोपींची नेवे आहेत. उद्योग मंडळ विभागय व्यवस्थपक भागवत भाऊसाहेब लांबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी यांनी संगनमताने त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे.
पंचायत समितीकडून आलेल्या कागदपत्रांमध्ये बदल केला. तसेच एक जागा खरेदी करुन शेतकरी बचतगट व वैयक्तीक शेतकरी यांच्या नावे केली. तसेच अन्य कागदपत्रांमध्ये फेरफार करुन काही कागदपत्रे गहाळ केली. व खोटे दत्तावेज तयार करुन गैरव्यवहार अपहार केला.
तसेच शासनाची फासणुक केली. हा प्रकार लांबे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती. यात तिघे दोषी अढळल्यामुळे त्यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*